
धुळे : शहरातील आग्रा महामार्गावरील भाजी विक्रेते आणि हॉकर्स यांना महापालिकेने हटविल्यानंतर वातावरण तापलं आहे. आपल्या उपजीविकेवर गदा आल्याने भाजी विक्रेत्यांनी आंदोलन छेडत धरणे आंदोलन सुरू केले.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मैदानात उतरली असून भाजी विक्रेत्यांना तात्काळ पर्यायी जागा देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेनेच्या शुभांगी पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या –
➡️ “भाजप नेते नाव रामाचं घेतात, पण काम मात्र रावणाचं करतात. रावणाने साधूचे रूप घेऊन फसवलं होतं, तसेच भाजप निवडणूक आयोगाच्या आडून सत्ता हस्तगत करतो.