सुरेश जैन आणि एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा मैत्रीचे संकेत! बदलत्या राजकारणात नवं समीकरण
पूर्वी राजकीय वैर असलेले दोन्ही नेते आता पुन्हा जवळ येत असल्याची चर्चा; जळगावच्या राजकारणात नवीन हालचालींना वेग

जळगाव :
जिल्ह्यातील राजकारणात एकेकाळी माजी मंत्री सुरेश जैन आणि एकनाथ खडसे यांचा दबदबा होता. दोघांचे राजकीय अस्तित्व स्वतंत्र आणि प्रभावी मानले जात असे. मात्र, काळाच्या ओघात सुरेश जैन राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून दूर झाले, तर एकनाथ खडसे अजूनही सक्रिय राजकारणात आहेत.
दोघांमध्ये पूर्वीपासूनच राजकीय मतभेद आणि वैर असल्याने एकमेकांचे फारसे कधी जमले नाही. परंतु, सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर दोघांमधील कटुता कमी होत असून, पुन्हा जवळीकी वाढल्याचे संकेत मिळत आहेत.
राजकारणातील या नव्या समीकरणामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरणात नवे रंग भरले आहेत. दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या पुन्हा जवळ येण्याने स्थानिक पातळीवर नवे राजकीय ताळमेळ घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काळात या नव्या समीकरणाचा परिणाम जिल्ह्यातील सत्तासमीकरणांवर कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे