बातमी
राणे कुटुंबाबद्दल बोलाल तर याद राखा!
मनोज जरांगे-पाटील याने नारायण राणे यांच्यावर बोलताना दोनवेळा विचार करावा. त्यानं जास्त जीभ वळवळू नये. पुन्हा नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीभ वळवळली, तर जीभ जागेवर ठेवायची की नाही, हे आम्ही ठरवू, असा एकेरी उल्लेख आमदार नितेश राणे यांनी जरांगे-पाटलांना इशारा दिला आहे. जरांगे पाटील आणि सरकार मधील वाद वाढतांना दिसत आहे.मराठा आरक्षणावर सगे सोयाऱ्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना दिले होते.निलेश राणे आणि मनोज जरांगे यांचा वाद वाढतांना दिसत आहे.