राजकारण
मविआ – महायुतीचा जागावाटपांचा तिढा सुटणार?
मविआ – महायुतीचा जागावाटपांचा तिढा सुटणार असल्याचे आजच्या बैठकांमधून दिसत आहे.आज संध्याकाळी महायुतीच्या घटक पक्षांची दिल्लीत बैठक होणार आहे यात भाजप ३६ जागांवर लढणार असल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळते.अजित पवार गटाला ३-४ जागा मिळतील असे बोलले जात आहे यात बारामती,रायगड,मावळ हे लोकसभा मतदारसंघ त्यांच्या वाट्याला येवू शकतात.मुंबईमधून ६ पैकी ५ जागा भाजप लढणार आहेत त्यात १ जागा शिंदे गट लढणार आहेत.७ तारखेला भाजपच्या कोअर कमिटीची मीटिंग होवून उमेदवारांची यादी जाहीर होणार आहेत. महाविकास आघाडीची ही आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे यात जागा वाटपाचा तिढा सुटणार आहे.