समाजकारण
-
“नाव रामाचं… काम रावणाचं!” – भाजपवर शुभांगी पाटील यांचा घणाघात!
धुळे : शहरातील आग्रा महामार्गावरील भाजी विक्रेते आणि हॉकर्स यांना महापालिकेने हटविल्यानंतर वातावरण तापलं आहे. आपल्या उपजीविकेवर गदा आल्याने भाजी विक्रेत्यांनी आंदोलन छेडत धरणे आंदोलन सुरू केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मैदानात उतरली असून भाजी विक्रेत्यांना तात्काळ पर्यायी जागा देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेनेच्या शुभांगी पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या –…
Read More » -
मला आरोग्यमंत्री करा!शिंदेंच्या लाडक्या आमदाराची मागणी
राज्यातील महायुतीच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याच्या निमित्ताने देण्यात आले.त्यात शिंदे सेनेच्याही मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास मर्जीतले लाडके आमदार संतोष बांगर यांनी मला आरोग्यमंत्री करा अशी मागणी केली आहे.आमदार बांगर यांच्या मागणीला उपमुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Read More » -
मंत्री कोकाटे यांचा सोमवारी राजीनामा? अजितदादांचा स्पष्ट संकेत
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मागील आरोपांची मालिका संपण्याचे नाव घेत नाही.विधानभवनात रमी खेळायाच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.सोमवारी अजित पवार हे त्यांना समोर बोलून सगळे विचारणार आहेत त्यानंतर त्यांच्या राजीनामा घ्यावा की नाही याच्यावर चर्चा होणार आहे.सरकारला भिकारी शब्द वापरल्याने त्यांचा ही जाब अजित पवार त्यांना विचारणार आहेत.
Read More » -
मी मामांच्या शब्दापुढे नाही!आ.तांबेकडून भाजप प्रवेशाला पूर्णविराम
‘माझ्यात आणि मामांमध्ये कुठेही दुरावा नाही. मी मामांच्या पुढे जाऊ शकत नाही, जाणारही नाही. हे माझे आयुष्यभराचे तत्त्व आहे’, अशा भावनिक शब्दांत आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या नात्यांची परखड मांडणी केली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात त्यांचे सख्खे मामा आहेत, याचा उल्लेखही त्यांनी विशेषत्वाने केला. गेल्या काही दिवसांपासून सत्यजित तांबे आणि माजी मंत्री थोरात यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू…
Read More » -
देवेंद्र फडणवीस हुशार आणि प्रामाणिक ठाकरेंकडून वाढदिवसानिमित्त स्तुतीसुमने
उद्धव ठाकरे काय म्हणाले? देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत. त्यामुळे देवेंद्र यांना भविष्यात केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महाराष्ट्र नायक’ या कॉफी टेबल पुस्तकात ठाकरेंनी गौरवोद्गार काढल्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यपालांच्या हस्ते पुस्तकाचं विमोचन करण्यात आलं. याशिवाय अजित…
Read More » -
‘कितीही मोठ्या बापाचा असूदे, टायरमध्ये घेऊन झोडायला सांगणार’; अजितदादांची कोणाला धमकी?
उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. अजित पवार स्पष्टवक्ते आहेत. ते शिस्तप्रियदेखील आहेत. त्यांना शिस्त आवडते. त्यामुळे ते शिस्तीच्या बाबतीत अधिकाऱ्यांनादेखील सोडत नाहीत. अजित पवार यांनी नुकतंच बारामतीकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बेशिस्त वागणाऱ्या तसेच नियम न पाळणाऱ्या बारामतीकरांना चांगलाच दम दिला “आईसारखं कुणी नसतं. मी पण ज्यावेळेस बारामतीत येतो त्यावेळेस आईला भेटतो. आज मला भरपूर कामे…
Read More » -
गिरीश महाजन यांनी मराठ्यांच्या नादी लागू नये…..मनोज जरांगे पाटील यांची टीका
राज्याचे ग्रामविकास,पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला पाटील यांनी उत्तर दिले आहे.मंत्री महाजन यांनी टीका करताना मनोज जरांगे यांनी त्यांची लायकी ओळखून त्यांनी आंदोलन सुरू ठेवावे अशी टीका केली होती,त्याला प्रतिउत्तर म्हणून जरांगे पाटील यांनी महाजन यांनी मराठ्यांच्या नादी लागू नये असे आवाहन महाजन यांना केली आहे.
Read More » -
मनोज जरांगे रुग्णालयात दाखल
मराठा आरक्षणावर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू करणारे मनोज जरांगे पाटील हे दि.२६ फेब्रुवारी रात्री १० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील गलॅक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले त्यांच्यावर रात्रीपासून उपचार सुरू आहेत. आमरण उपोषण मागे घेण्याच्या निर्णय जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी राज्यभर दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते त्यासाठी त्यांनी अगोदर उपचार घ्यावे असे त्यांच्या सहकारी उपोषणकर्त्यांची मागणी होती त्या मागणीला होकार…
Read More »