
जालना : वकील गुणरत्न सदावर्ते आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता काही मराठा आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवत गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून आंदोलकांना रोखले.
या घटनेनंतर सदावर्तेंनी जोरदार प्रतिक्रिया दिली. त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील व माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर सडकून टीका केली. एवढंच नव्हे तर, त्यांनी जरांगे यांना थेट चॅलेंज देखील दिलं.
आता सदावर्तेंच्या या आव्हानाला मनोज जरांगे काय उत्तर देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.