बातमी
जरांगे पाटील कुठे पोहचले पहा…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेली सहा महिने उपोषण आणि आंदोलन करणारे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत अचानक आक्रमक होत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांची तोफ डागली.पत्रकार परिषदेत पाटलांचा जोर हा फडणवीस यांच्याकडेच बघायला भेटला.मला सलाईनद्वारे विष दिले जात होते यांच्यामागे पूर्ण हात हा फडणवीस यांचा होता असा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे.पत्रकार परिषदेत जरांगेंनी आक्रमक होत मी देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील सागर या शासकीय निवासस्थानी जात असल्याचे जाहीर केले होते.दुपारी जरांगे पाटील हे मुंबई कडे रवाना झाले होते.