बातमी
पावसाचा जोर वाढणार! येत्या ४-५ दिवसांत धुवांधार, काय सांगतो IMDचा अंदाज?

ऑगस्टचा संपूर्ण महिना आणि सप्टेंबरच्या तीन आठवड्यांपर्यंत राज्यात पावसाचा जोर फारसा नव्हता. मात्र आता सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील मान्सूनचा परतीचा प्रवासही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवरात्रोत्सवावरही पावसाचे सावट असू शकेल. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी वर्तवलेल्या पुढील दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार पावसाची सक्रियता वाढणार आहे.



