खांदेश
-
“नाव रामाचं… काम रावणाचं!” – भाजपवर शुभांगी पाटील यांचा घणाघात!
धुळे : शहरातील आग्रा महामार्गावरील भाजी विक्रेते आणि हॉकर्स यांना महापालिकेने हटविल्यानंतर वातावरण तापलं आहे. आपल्या उपजीविकेवर गदा आल्याने भाजी विक्रेत्यांनी आंदोलन छेडत धरणे आंदोलन सुरू केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मैदानात उतरली असून भाजी विक्रेत्यांना तात्काळ पर्यायी जागा देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेनेच्या शुभांगी पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या –…
Read More » -
खडसे मातब्बर नाही,भिकारचोट नेता! भाजप आमदाराची शिवराळ भाषेत टीका
”एकनाथ खडसे हे नाहक गिरीशभाऊंवर टिका करत आहेत. त्यांनी गुलाबी गोष्टी ऐकल्या की नाही माहित नाही, तथापि खडसेंच्या रंगल्या रात्रींच्या अनेक गोष्टी आमच्याकडे असून ते आम्ही लवकरच उघड करू. तसेच त्यांच्याकडे अनेक अधिकाऱ्यांचे पैसे बाकी असून याचा मुक्ताईनगरला जाऊन गौप्यस्फोट करणार !” असे सांगत आ. मंगेश चव्हाण यांनी खडसे मातब्बर नाही तर भिकारचोट नेता आहे असे जोरदार टिकास्त्र सोडले.
Read More » -
दिल्लीतून आदेश आला? महाराष्ट्रातील या मंत्र्यांचा राजीनामा!
विरोधकांनी केलेल्या आरोपांमुळे राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री अडचणीत आले असून त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याच्या चर्चेला आता तोंड फुटले आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन सहा ते सात महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला नसतानाच जवळपास तीन ते चार मंत्री वादात सापडले आहेत. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना शिवसेनेचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा त्यांच्याच बेडरूममधील एक व्हिडीओ समोर आला होता. या…
Read More » -
राज्याच्या मंत्रीमंडळात मोठे फेरबदल; मुख्यमंत्री फडणविसांचे धक्कातंत्र! कोणाला संधी, कोणाला डच्चू?
राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे#Devendra महायुतीच्या बैठकीत झाल्याची चर्चा आहे.सूत्रांच्या माहितीनुसार राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला वादग्रस्त मंत्र्यांमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धक्कातंत्र वापरणार का? मंत्री माणिकराव कोकाटेंना डच्चू? महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात तसेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक प्रकरण त्यांना चांगलेच…
Read More » -
काँग्रेसला खानदेशात मोठा धक्का! कुणाल पाटलांचा भाजप प्रवेश फायनल
माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने खानदेशातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे,पाटील यांनी त्यासंबंधी आज दुपारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता त्यात त्यांनी मते जाणून घेतली कार्यकर्त्यांनीही त्यांच्या सोबत असल्याचे सांगितले. कुणाल पाटील हे धुळे ग्रामीणचे दोन वेळा विजयी आमदार, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष, शिक्षण आणि सामाजिक कार्यात सक्रिय, आणि पुढील निवडणूक आणि पक्षांतर्गत रणनीतीत केंद्रबिंदू ठरले आहेत. सध्या त्यांच्या…
Read More » -
मंत्री गिरीश महाजन यांना पराभूत कोण करणार? जरांगे फॅक्टर की पवारांची तुतारी
जामनेर महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील एक तालुका आहे. हे शहर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. जामनेरची ओळख मुख्यतः येथील कृषी व्यवसाय आणि शेतीसाठी होते. येथे कापूस, ज्वारी, गहू आणि कांदा यांसारख्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.शहरात प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्यात धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो. जामनेर तालुक्याची राजकीय परिस्थिती महाराष्ट्रातील इतर तालुक्यांप्रमाणेच सक्रिय आणि…
Read More » -
राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट; काही भागात पावसाची शक्यता
राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. तर काही भागांत ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस वेगवेगळ्या भागात विजांच्या कडकडाटांसह पाऊस, सोसाट्याचा वारा आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. दरम्यान, राज्यात शुक्रवारी सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे.दक्षिण विदर्भापासून मराठवाडा ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात गेले काही दिवस…
Read More » -
या मतदारसंघात रंगणार नणंद- भावजाई सामना
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे रोहिणी खडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या सोबत बैठक घेऊन रोहिणी खडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात नणंद -भावजयी सामना रंगणार आहे.
Read More » -
भाजपा या मतदारसंघात उमेदवार बदली ची चर्चा..
भाजपाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार स्मिता उदय वाघ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.परंतु भाजपाने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना दिले आहे तिकीट नाकारण्याच्या नाराजीतून उन्मेष पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला त्यांची सोबत पारोळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण पवार यांनी सुद्धा प्रवेश केला आहे.हा एक…
Read More » -
उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा तडाखा
जळगांव जिल्ह्याच्या काही भागात आज बेमोसमी पाऊस आणि गारपीट झाली. पारोळा आणि मोंडाळे,वेल्हाने,तमासवाडी येथे गारपीट तर परिसरातील भागात रात्री दहाच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. गारपिटीमुळे कोणत्या पिकांचे नुकसान ? पारोळा तालुक्यातील बोरी नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगाम घेतला जातो यात प्रामुख्याने गहू,हरभरा,ज्वारी,दादर इत्यादी पिके घेतली जातात.यामुळे या पिकांचे ऐन काढणीच्या वेळेवर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . गारपिटीचा…
Read More »