बातमी
धावत्या रेल्वे मधून तरुणी रफूचक्कर? सामान सिटवरच मग अर्चना गेली कुठे?

सिव्हिल जजची तयारी करणारी एक तरुणी अचानक गायब झाली आहे. इंदूर येथील ही तरुणी चालत्या ट्रेनमधून बेपत्ता झाली आहे. अद्याप तिचा कोणताही पत्ता लागलेला नाही. 28 वर्षीय अर्चना तिवारी 7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी इंदूरहून कटनीला ट्रेनने निघाली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेन कटनीला पोहोचली, पण अर्चना त्यात नव्हती. अर्चनाचे सामान तिच्या सीटवरच आढळून आले होते. इतकंच नाही तर, तिचा मोबाईल नंबरही बंद आहे.