क्राईमराजकारण

महेश गायकवाडला हॉस्पिटलमधून सुट्टी! ….जाणून घ्या पहिली प्रतिक्रिया

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला होता. या गोळीबारात महेश गायकवाड जखमी झाले होते.आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

कोण आहेत गणपत गायकवाड?

आमदार गणपत गायकवाड सध्या एका घटनेमुळे राज्यातच नाही तर देशभरात चर्चेत आले आहेत. एका संयमी आमदाराने इतके टोकाचे पाऊस का उचलले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गणपत गायकवाड हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.आमदार गणपत गायकवाड यांनी सुरवातीला उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा देखील चालवली असल्याचं म्हटलं जातं. यानंतर आमदार गणपत गायकवाड केबलच्या व्यवसायात आले. केबलच्या व्यवसायात त्यांनी बरीच प्रगती केली. यशस्वी उद्योजक झाल्यानंतर त्यांनी २००९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दोन वेळा ते अपक्ष निवडून आले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिसऱ्यांदा भाजपच्या तिकीटावर आमदार झाले. आता ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.

महेश गायकवाड कोण आहेत?

 

महेश गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख आहेत. कल्याणमधील सामाजिक कार्यात गायकवाड यांचा सहभाग असतो. महेश गायकवाड यांच्यासाठी लावलेल्या एका बॅनरवर त्यांचा ‘भावी आमदार’ असा उल्लेख करण्यात आला होता.

काय म्हणाले महेश गायकवाड ?

उन्हाळ्यात उन्हात असू द्या पावसात पूर असू द्या त्या ठिकाणी सातत्याने मी काम करत होतो ते काम करत असताना मला बऱ्याच वेळा आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या परिवाराकडून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी केंद्रीय मंत्री ना.कपिल पाटील साहेब तसेच ना.रविदादा चव्हाण साहेब यांच्याकडे मी तक्रार केली होती आपण त्यालाही समजावून कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही. आपण अशा पद्धतीचे मला सांगण्यात यायचं मला मी जेव्हा काम करत असताना गणपती गायकवाड मला प्रतिस्पर्धी समजत होते पण कोणत्या प्रकारचा स्पर्धक नव्हतं मी फक्त एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत होतो.कल्याण पूर्वेचा सुजाण नागरिक म्हणून मला कल्याण पूर्वची दशा अतिशय खराब अवस्था असलेली रस्ते हे बघवत नव्हते म्हणून मी ते कार्य करत होतो प्रत्येक वेळी आमदार गणपत गायकवाड यांचा माझ्या बाबतीत राग होता कोणत्याही प्रकारचं व्यवहारिक बिजनेस करण्याच्या कारणांनी सुद्धा काही ठिकाणी मी त्या ठिकाणी काम करत असताना सुद्धा समोरच्या लोकांना अडचणी करणे सातत्याने चालू होत्या आणि त्याने शेवटचा प मी कल्याण पूर्वेसाठी प्रत्येक अडी-अडचणीसाठी विकास काम असू द्या किंवा त्यांच्या आरोग्य संबंधित असू द्या शेवटपर्यंत काम केले आणि करत राहणार असे या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »