राजकारण
शरद पवार – सुप्रिया सुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सागर बंगल्यावर गुप्त बैठकीची चर्चा
खा.शरद पवार व त्यांच्या कन्या खा.सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक गुप्त बैठक पार पडल्याची चर्चा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सौ.सुनेत्रा पवार ह्या महायुतीच्या उमेदवार असतील तर सौ.सुप्रिया सुळे यांना ही निवडणूक अडचणीची ठरू शकते अशी चर्चा रंगू लागल्या आहेत यामुळेच पवारांनी फडणवीसांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.