
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मागील आरोपांची मालिका संपण्याचे नाव घेत नाही.विधानभवनात रमी खेळायाच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.सोमवारी अजित पवार हे त्यांना समोर बोलून सगळे विचारणार आहेत त्यानंतर त्यांच्या राजीनामा घ्यावा की नाही याच्यावर चर्चा होणार आहे.सरकारला भिकारी शब्द वापरल्याने त्यांचा ही जाब अजित पवार त्यांना विचारणार आहेत.