आमदार निलेश लंके खरंच अजितदादांची साथ सोडणार का ?
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहेत.पारनेर विधानसभा मतदारसंघात 2019 ला तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांना मोठ्या फरकाने पराभूत करून प्रकाश झोतात आले होते. विजय औटी आमदार असताना उद्धव ठाकरे पारनेर दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांच्या ताब्यावर दगडफेक करत गोंधळ घातला होता असा त्यांच्यावर आरोप होता. आमदार लंके हे सर्वसाधारण कुटुंबातून येत त्यांनी जनसंपर्काच्या जोरावर आमदारकी आपल्या पदरात पाडली होती. आमदार झाल्यावर शरद पवारांचा निष्ठावंत सैनिक म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले 2020 च्या कोरोनाच्या महामारीत त्यांनी आपल्या मतदारसंघात शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून हजारो कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात म्हणून उपचार केले होते अजित पवारांच्या बंडानंतर त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता पण येणाऱ्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करण्यासाठी शरद पवार यांच्या गटात प्रवेश करत आहेत.