भाजप जळगांव लोकसभेचा गड राखणार का ? हातातून जाणार..!
जळगाव लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत सर्वाधिक काळ भाजपच्या खासदार निवडून आला आहे या लोकसभा मतदारसंघात जळगाव शहर, जळगांव ग्रामीण पारोळ- एरंडोल, पाचोरा -, अमळनेर ,चाळीसगाव हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यात संख्याबळाचा विचार केला तर भाजप २,शिंदे गट ३, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १ असे बलाबल आहे. २०१९ चा विचार केला असता चाळीसगाव विधानसभेचे विद्यमान आमदार उन्मेष पाटील यांना भाजपाने ऐनवेळी उमेदवारी दिली त्यांनी माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांचा दारूण पराभव केला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप तर्फे विषय सरकारी वकील उज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम आमदार मंगेश चव्हाण,विद्यमान खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटाकडून डॉ. हर्षल माने ,जळगावचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख निलेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे वाल्मीक पाटील ,विकास पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्यातर्फे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या सौभाग्यवती जयश्री अनिल पाटील यांचे नाव चर्चेत आहे.
रोहित निकम
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम हे जिल्हा दूध संघात भाजपच्या पॅनल तर्फे निवडून आले आहेत त्यांचा फार त्यात फारसा जनसंपर्क नसला तरी राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाचा त्यांना फायदा होऊ शकतो
आमदार मंगेश चव्हाण
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण हे जिल्हा दूध संघाचे चेअरमन असून त्यांची जिल्ह्यात एक वेगळी ओळख आहे. मंगेश चव्हाण यांना मराठा चेहरा म्हणून भाजपा लोकसभेच्या आखाड्यात उतरू शकते
डॉ.हर्षल माने
डॉ.हर्षल माने हे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख असून त्यांनी आता नुकत्याच झालेल्या मार्केट कमिटी च्या निवडणुकीत पारोळा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांचा दारूण पराभव केला होता डॉक्टर माने हे वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असल्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.
कुलभूषण पाटील
जळगाव महानगरपालिकेची माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे ठाकरेगट शिवसेना यांच्याकडून इच्छुक आहेत उपमहापौर म्हणून त्यांनी जळगाव शहरात चांगले काम केले आहे.
सौ.जयश्री अनिल पाटील
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या सौभाग्यवती जयश्री पाटील या अमळनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा असून नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी शहरात चांगली कामे केली आहे. त्या जिल्हा परिषद वरील देखील निवडून गेलेले आहेत मंत्री पाटील यांच्या अमळनेर मतदारसंघातील वर्चस्वाचा त्यांना फायदा होऊ शकतो.