राजकारण
मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ करा! काँग्रेस आमदाराची राज्यपालांकडे मागणी
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केलेले अंतरवली सराटी येथील कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करावी आणि त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी यासाठी जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे.
कोण आहेत कैलास गोरंट्याल ?
कैलास गोरंट्याल हे जिल्ह्यातून काँग्रेसचे आमदार आहेत. जालना मतदारसंघातून ते तीन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेत. त्यांच्या पत्नी संगीता जालना नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आहेत.2019 विधानसभा निवडणुकीत कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांचा पराभव केला. खोतकरांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची जालना जिल्ह्यात ओळख आहे.