
नागपूर : केंद्रीय नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत भाष्य करताना मोठं वक्तव्य केलं. “मी ब्राह्मण जातीचा आहे. आमच्यावर परमेश्वराने सगळ्यात मोठा उपकार केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रात बामणाला महत्त्व नाही. पण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये खूप आहे. मी ज्यावेळेस तिकडे जातो तर सगळे लठ्ठेबाज आहेत. दुबे, त्रिपाठी, मिश्रा यांचं राज्य पावरफुल आहे. जसं इकडे मराठा जातीचं महत्त्व आहे, तसं उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्त्व आहे. ते मला सांगतात, मी जातपात पाळत नाही. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, कोणतीही व्यक्ती ही त्याची जात, धर्म, लिंग या गोष्टींना मोठा नाही तर त्याच्या गुणांनी मोठा आहे”, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं