राहत्या घराच्या मागे अघोरी पूजा;संपूर्ण कुटुंब मृत्यूच्या खायेत

कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावात एकाच कुटुंबातील दोन महिलांसह चौघांनी सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेत सासू आणि सुनेचा जागीच मृत्यू झाला; तर बापलेकाला बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती कवठेमंकाळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम पाटील यांनी दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नांगोळे येथे बाळासाहेब उर्फ अल्लाउद्दीन पाटील यांचे कुटुंब राहते. त्यांची दोन ठिकाणी घरे असून, मुलगा, सून आणि दोन नातू; तर दुसऱ्या घरात अल्लाउद्दीन पाटील पत्नीसह राहत असत.शुक्रवारी दुपारीही सर्व जण एकाच घरात असताना सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न झाला. सून काजल समीर पाटील, वय 30, आणि सासू रमेजा अल्लाउद्दीन पाटील, वय 45, या दोघींचा जागीच मृत्यू झाला; तर अल्लाउद्दीन आणि समीर या दोघांनाही बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.