राजकारण
शिंदे गटाचे मा.खा.शिवाजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ?
शिंदे गटाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे चर्चांना उत आले आहे.पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा नेतृत्व केलेले आढळराव पाटील हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खा.अमोल कोल्हे यांच्याकडून पराभवाचे तोंड पाहणारे पाटील हे २०२४ ला पुन्हा लोकसभेत जाण्यासाठी अजितदादा यांचा हात धरावा लागेल.अजित पवारांनी खा.अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचे विडा उचलला आहे याचा फायदा आपल्याला व्हावा यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.