पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३ जाहीर
पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३
महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक २३/०६/२०२२ च्या सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक, यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दि.०५/०३/२०२४ ते ३१/०३/२०२४ या कालावधीत स्वीकारण्यात येतील. ह्या बाबतची सविस्तर माहिती policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे.
■ उमेदवारास पोलीस अधीक्षक, यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment2024.mahit.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.
उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो.
■ ■ उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.
■ पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल, त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
■ भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
■ सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाबत विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
■ शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती (Provisional Selection) असेल. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृह विभाग शासन निर्णय, दि.१०/१२/२०२० नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
■ पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे/ कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी. तसेच सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरिता उपलब्ध पदांच्या १% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करावेत.
■ भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास, त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल. कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही.
■ उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे. त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करू शकतात, परंतु खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करू शकणार नाहीत.
■ पदोन्नतीवरील आरक्षणासंदर्भात शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ बाबत होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या आदेशाच्या अधिन राहून व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्रमांक १७५/२०१८ व इतर संलग्न याचिकांमध्ये दि.२७/०६/२०१९ रोजी दिलेल्या निर्णयाविरुद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेबाबत होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून रिक्त पदांची गणना केलेली आहे. त्यामुळे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार नियुक्ती अधिकारी यांना पदे भरण्याचा अधिकार आहे.
सही-