राजकारण

धुळे लोकसभेचा पुढचा खासदार कोण? बाबा, जिभाउ, डॉक्टर की भाईजी!

धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव शहर मालेगाव बाह्य सटाणा,धुळे शहर,धुळे ग्रामीण,शिंदखेडा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यात भाजप २,MIM २ ,शिंदे सेना १,काँग्रेस १ असे संख्याबळ आहे.या लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक काळ भाजपचा खासदार निवडून आला आहे.यात विद्यमान खासदार डॉ.सुभाष भामरे हे दोन वेळा निवडून आले आहेत.आता भाजप कोणाला उमेदवारी देत यावर पुढचे विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.भाजपतर्फे हर्षवर्धन दहीते, डॉ.सुभाष भामरे काँग्रेसतर्फे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुणाल पाटील,मालेगावचे डॉ. तुषार शेवाळे, शिवसेनेतर्फे मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे इच्छुक आहेत

आ.कुणाल पाटील

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुणाल पाटील यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे लढवली होती परंतु त्यांना पराभव स्विकारावा लागला होता . काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांचे खानदेश परिसरात वेगळे अस्तित्व आहे जवाहर ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक,राजकीय शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील अग्रणी आहेत त्यांचे वडील माजी मंत्री रोहिदास पाटील यांचाही खानदेशात फार मोठा धबधबा आहे

हर्षवर्धन दहिते

जिल्हा परिषद सदस्य असलेल्या हर्षवर्धन दहीते यांना जिभाऊ या नावाने ओळखले जाते वडील शिवाजीराव दहिते हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत माजी मंत्री अमरीश पटेल यांच्या नेतृत्वात राजकारणात सक्रिय असून ते मूळचे साक्री तालुक्याचे रहिवासी आहेत त्यांचा फारसा जनसंपर्क नसून भाजपच्या उमेदवारीचा त्यांना फायदा होऊ शकतो

डॉ.तुषार शेवाळे

धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर, मालेगाव बाह्य, सटाणा या विधानसभा मतदार संघाचा समावेश होत असून काँग्रेसचे तुषार शेवाळे हे मालेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांचे वैद्यकीय क्षेत्रात मोठे काम आहे २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून इच्छुक असलेले डॉक्टर शेवाळे हे २०१९ विधानसभा निवडणुकीत मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात लढले होते  परंतु त्यात त्यांचा पराभव झाला होता

डॉ.सुभाष भामरे

डॉ. सुभाष भामरे यांनी २०१४ साली शिवसेनेमधून भाजपा प्रवेश करत विद्यमान खासदार स्वर्गीय प्रतापराव सोनवणे यांची उमेदवारी  कापत उमेदवारी मिळवली होती त्यात ती विजयी झाले होते त्यांनी माजी मंत्री अमरीश पटेल यांचा पराभव केला होता मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसचे कुणाल पाटील यांचा पराभव केला होता.त्यांनी मनमाड इंदूर रेल्वेसाठी केलेल्या प्रयत्नामुळे त्यांना फायदा होऊ शकतो.

आविष्कार दादाजी भुसे

अविष्कार भुसे शिंदे सेनेचे मंत्री दादा भुसे  यांचे चिरंजीव आहेत.आविष्कार भुसे  हे युवा सेनेच्या माध्यमातून खानदेशात सक्रिय आहेत धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो ही त्यांची जमेची बाजू आहे दादा भुसे यांनी धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळली होती त्याचाही त्यांना फायदा होऊ शकतो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »