बातमी
या महाराष्ट्राच्या जेष्ठ नेत्याच्या गळ्यात उपराष्ट्रपती पदाची माळ!

पदावर असतानाच प्रकृतीच्या किंवा इतर कारणामुळे राजीनामा देऊ करणारे देशाचे पहिले उपराष्ट्रपती, अशी नोंद झालेले राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वीकारतात की नाही, हे काही तासांमध्ये स्पष्ट होईल. मात्र, उपराष्ट्रपती धनखड जर आपल्या राजीनाम्यावर ठाम असतील व राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतला तर या पदासाठी दुसऱ्या नेत्याची निवड करणे क्रमप्राप्त असेल.
त्या परिस्थितीत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे.याशिवाय तमिळनाडूचे राज्यपाल रवी किंवा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याही नावाचा या पदासाठी विचार होऊ शकतो, असे समजते.