राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर उत्तर देण्यासाठी अकोला येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडीचे फार मोठे नुकसान केले आहे या दगडफेकीदरम्यान एका मनसे कार्यकर्त्याच्या जीवावर बेतले दगडफेकीदरम्यान उडालेल्या गोंधळात मनसे सैनिकाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते उपचार दरम्यान आज त्याचे निधन झाले. घरातील करता मुलगा गमावल्याने आईचा पुरुष पाहून उपस्थित त्यचेही डोळे पाणावले. आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेवर बोलताना मनसे सैनिकांनी सांगितले की अमोल मिटकरी हे आम्हाला घाबरून संडासात लपून बसले होते.