
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप सध्या जोरदार चर्चेत आले आहेत त्यातच आज त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
आ. आमदार संग्राम जगताप यांनी काही दिवसापूर्वी अक्कलकोट येथे झालेल्या मोर्चाच्या प्रसंगी एका समुदायाबद्दल वादग्रस्त विधायक केले होते याच्या निषेधार्थ राज्यातील मुस्लिम संघटनांनी त्यांच्याविरुद्ध मोर्चे काढले होते त्यातच अहिल्यानगर शहरात हिंदू संघटनांनी त्यांच्यासमनार्थ मोर्चा काढला होता. आज आज त्यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे ठार मारण्याची धमकी त्यांची खाजगी स्वीय सहाय्यक यांच्या मोबाईलवर टेक्स मेसेज करून देण्यात आली आहे त्यात दो दिन मे खतम कर डालेंगे असा उल्लेख करण्यात आला आहे याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.