
राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे#Devendra महायुतीच्या बैठकीत झाल्याची चर्चा आहे.सूत्रांच्या माहितीनुसार राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला वादग्रस्त मंत्र्यांमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धक्कातंत्र वापरणार का?
मंत्री माणिकराव कोकाटेंना डच्चू?
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात तसेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक प्रकरण त्यांना चांगलेच भोवनार असल्याचे बोलले जात आहे.मंत्री कोकाटे यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे,त्यांच्या जागी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खानदेशातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाणार आहे.आ.पाटील यांचे खानदेशात मोठे संघटन आहे त्यांच्यावर पक्षांतर्गत जळगांव,धुळे,नंदुरबार या जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे.
मंत्री संजय शिरसाट यांचाही नंबर लागणार?
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांचा बेडरूम मधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ वरून विरोधकांनी विधानसभेत आक्रमक भूमिका मांडली होती.मंत्री शिरसाठ हे हॉटेल खरेदीत देखील सहभागी होते.त्यांच्या विभागात मोठा टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप माजी खासदार जलील यांनी केला आहे.यावरून मंत्री शिरसाठ यांना घरी जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.त्यांच्या जागी पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांना संधी दिली जाईल अशी शक्यता आहे.पुणे जिल्ह्यात शिंदे सेनेला मोठे यश प्राप्त करण्यासाठी शिवतारेंना मंत्रिपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.