शेतीविषयक
“शेतकऱ्याने बैल नाहीत म्हणून स्वतःच औताला जुंपले” सोनू सूद हळहळला पाठवली थेट बैलजोडी!

लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेताच्या मशागतीसाठी बैल नाहीत म्हणून स्वतःच स्वतःला औताला जुंपले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर शेतकऱ्यांची किती दयनीय अवस्था असल्याच वास्तव साऱ्या जगाच्या पुढे आले.
सोशल मीडियामुळे तो व्हिडिओ व्हायरल होत असताना प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांच्यापर्यंत पोहोचला त्यांनी थेट त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून बैल जोडी पाठवत असल्याचं संदेश दिला त्याबाबत त्यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून ही माहिती दिली आहे.