देवेंद्र फडणवीस पराभूत होऊ शकतात असं नागपुरात का बोललं जातंय?
देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून त्यांचा राजकीय आलेख नेहमी चढता राहिला आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी यंत्रणा उभी केली होती या यंत्रणेच्या माध्यमातून मतदार यादी वाचनाचा कार्यक्रम भाजपाने राबविला होता परंतु तरीही मतदार यादीतील घोळा मुळे हजारो मतदार मतदानापासून मुकले होते. यावरून भाजपा कोर कमिटीला स्थानिक कार्यकारणी काम करत नसल्याचे निदर्शनास आले होते याच कारणावरून दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकारणी बरखास्त केली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कोट्यवधी रुपयांचा निधी या मतदारसंघात दिला होता. नागपूर महानगरपालिकेचे महापौर पद सुद्धा याच मतदारसंघातून वेळा देण्यात आले होते. लोकसभेचे घडलेलं मताधिक्य पाहून देवेंद्र फडणवीस यांची चिंता वाढली आहे. तिकडे काँग्रेसचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे
देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द
१९९२ – पहिल्यांदा नागपूरचे नगरसेवक
१९९५ – दुसऱ्यांदा नगरसेवक ते थेट नागपूरचे महापौर पद
१९९९ – नागपूर पश्चिम मतदार संघातून पहिल्यांदा आमदार
२००४ – दुसऱ्यांदा आमदार
२००९ – नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघातून आमदार
२०१४ – राज्याचे मुख्यमंत्री
कोणत्या आकड्यांनी भाजपाचे टेन्शन वाढले?
2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांना 65 हजाराचे मताधिक्य मिळाले होते परंतु तीन महिन्यानंतर झालेल्या विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांचा 49 हजारांच्या मताधिक्याने विजय झाला होता या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक लाख मताधिक्यांनी विजयी करण्याचे संकल्प केला होता
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातून केवळ 33 हजारांचे मताधिक्य आहे या मताधिक्यातून भाजपाची चिंता वाढली आहे.