खळबळजनक : एसटी महामंडळाच्या वरिष्ठ लिपीकाने केली महिलेचा शरीरसुखाची मागणी !

शहरातील एसटी महामंडळाच्या कार्यालयातील महिलेचा त्याच कार्यालयात काम करणाऱ्या वरिष्ठ लिपीकाने अश्लिल हावभाव आणि द्विअर्थाने बोलून शरिरसुखाची मागणी करीत विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयित रामलाल निवृत्ती पवार याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करणयात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, जळगाव येथील एसटी महामंडळाच्या कार्यालयात महिला कर्मचारी नोकरीस आहे. जुलै २०२४ मध्ये त्यांच्या कार्यालयात काम करणारा रामलाल पवार याने त्या महिलेच्या मोबाईलवर मॅसेज करुन त्यांच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करु लगला. त्यानंतर कार्यालयात महिला कर्मचाऱ्याच्या दिशेने खुर्ची आणि तोंड करुन त्यांना अश्लिल हावभाव करुन द्विअर्थाने त्यांच्यासोबत बोलू लागला. महिलेने त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्यानंतर त्या संशयिताने सेवापुस्तक ऑनलाईन भरण्यासाठी सुद्ध त्यांच्या लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने बोलून महिलेकडे त्याने शरिरसुखाची मागणी केली होती.
दि. ३ जुलै रोजी सायंकाळी महिला काम करीत असतांना संशयित रामलाल पवार याने महिलेजवळ येवून तुझा पुन्हा रिपोर्ट करेल व तुला जेरीस आणेल असे म्हणत धमकी देत पुन्हा शरिरसुखाची मागणी करीत महिलेचा विनयभंग केला. कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून वारंवार महिलेसोबत अश्लिल वर्तन करुन तिचा विनयभंग केला. दरम्यान, महिलेने लागलीच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित रामलाल निवृत्ती पवार याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहे.