बातमी
राज ठाकरेंनी बॉडीगार्ड आवरा! मराठा समाजाच्या छातीवर हात घालणारा अजून जन्माला आलेला नाही
काल सोलापुरात महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून वादग्रस्त विधान केल्यानंतर धाराशिव दौरावर आल्यावर राज ठाकरे यांनी मराठा कार्यकर्त्यांची भेट घेतली या भेटीत राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे अंगरक्षक यांनी आंदोलकांना रेटारेटी केली यात काही आंदोलकांना मारहाण झाल्याच्या आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे यात एका मराठा आंदोलकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की राज ठाकरे यांनी त्यांच्या बॉडीगार्ड यांना आवर घालावा अन्यथा आम्ही ही जशास तसे उत्तर देऊ मराठा समाजाच्या छातीवर हात घालणारा अजून जन्माला आला नाही.