क्राईम
रमी सर्कलवर पत्ते खेळण्यासाठी फौजदाराने चोरल्या दुचाकी बीड जिल्हा पोलिसांत खळबळ !

जे पोलीस जनतेची रक्षण करण्यासाठी वर्दी घालतात त्याच पोलीस खात्यातील एक सहाय्यक फौजदार बनला चोर,पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे वायरलेस विभागात कार्यरत असलेल्या या फौजदाराने बॅटऱ्यावर टीव्ही चोरी केला आणि जामीनवर सुटला.त्यानंतर त्याने पुन्हा मोटारसायकल चोरी केल्याची उघड झाले आहे याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अमित मधुकर सुतार वय 35 जाणार खोकरमोहा तालुका शिरूर कासार यांच्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे दरम्यान अशी माहिती मिळाली आहे की फौजदाराला ड्रीम इलेव्हन रमी ॲप ऑनलाइन सट्टा दारूचे व्यसन होते या व्यसनांमुळे तो कर्जबाजारी झाला होता ते कर्ज फेडण्यासाठी त्याने चोरीची वाट धरली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याला पोलीस खात्यातून निलंबित केले असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले आहे.