खांदेशशेतीविषयकहवामानहवामान

राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट; काही भागात पावसाची शक्यता

राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. तर काही भागांत ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस वेगवेगळ्या भागात विजांच्या कडकडाटांसह पाऊस, सोसाट्याचा वारा आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. दरम्यान, राज्यात शुक्रवारी सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे.दक्षिण विदर्भापासून मराठवाडा ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात गेले काही दिवस पावसाला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाऊस तर काहीभागात गाराही पडल्या आहेत. मात्र, त्याचबरोबर काही भागांत उष्णतेची लाट आहे. विदर्भात उष्णतेचा कहर सुरू आहे. अनेक भागांचे तापमान ४० अंशांच्या पुढे आहे, तर मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घट झाली आहे.

येत्या २० ते २३ एप्रिल दरम्यान, कोकणवगळता मध्य महाराष्ट्र,मराठवाडा व विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटांसह पाऊस तर काही भागात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. त्यानंतरही तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »