बातमी
…तर संपूर्ण पक्ष आणला असत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विधान
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबाबत मोठा खुलासा केला आहे. अजित पवार यांनी त्याच्या शैलीत राजकारणात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मी मोठा असल्याचे सांगितले. यावेळी तेथे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की, जर भाजपा आणि शिवसेनेने मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असती तर मी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत आणले असते. सगळे पुढे सरसावले आणि मी मागे राहिलो. मी गंमतीने काही लोकांना सांगितले की, तुम्ही शिंदे यांना इतके आमदार घेऊन येण्यास सांगितले होते आणि मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असती तर मी, संपूर्ण पक्षाला सोबत आणले असते.’ असा दावा त्यांनी केला आहे.