बातमी

एकटे राहणे जीवावर बेतले बालकाचा दुर्दैवी मृत्यू

घरात

नळ आले म्हणून पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटार चालू करण्यासाठी पिन लावताना करंट लागल्याने एका ११ वर्षीय शाळकरी बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना दि १ एप्रिल रोजी अमळनेर शहरात घडली.हर्षल योगेश पाटील, वय १२ वर्ष, रा सबगव्हान ता अमळनेर असे मयत बालकाचे नाव असून तो अमळनेर शहरातील सानेगुरुजी शाळेतील इयत्ता सहावीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील योगेश दगडू पाटील शेती करतात, शिक्षणासाठी तो आईवडील व भावासह गलवाडे रस्त्यावरील साई गजाजन नगरात वास्तव्यास होता. दि १ रोजी त्याचे आईवडील सबगव्हाण येथे शेतात तर मोठा भाऊ पेपर देण्यासाठी गेला असताना हर्षल एकटाच घरी होता, दुपारी १ वाजता नळ आल्याने हर्षल हा पाणी भरण्यासाठी मोटार चालू करण्यासाठी गेला असता मेल फ्फिमेल पिन जोडत असताना त्याचे हात ओले असल्याने नजरचुकीने त्याला विजेचा शॉक लागून जिन्याखालीच तो कोसळला व मयत झाला. मोठा भाऊ पेपर संपल्यावर घरी आला असता त्याला हर्षल जिन्याखाली पडलेला आढळून आला मात्र तोपर्यंत उशीर झाल्याने हर्षल जीवानिशी गेला होता. सदर घटनेची वाच्यता झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. हर्षलचा मृतदेह अमळनेर ग्रामिण रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »