बातमी

भाजपला मोठा धक्का! हर्षवर्धन पाटील हाती घेणार तुतारी!

महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांनी शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे दोन प्रमुख नेते शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. कोल्हापूरचे भाजपचे नेता समरजीत घाटगे आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव यामध्ये समाविष्ट आहे.कोल्हापुरात अजित पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची कागलमधून उमेदवारी जाहीर केली आहे. समरजीत घाटगे यांना येथे उमेदवारी मिळवण्याची इच्छा होती, पण महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ताब्यात जाऊ शकते. त्यामुळे समरजीत घाटगे शरद पवार गटात प्रवेश करतील, असे मानले जात आहे. इंदापूरमध्येही राष्ट्रवादी अजित पवार गटाने दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे.

आज  होणाऱ्या महायुतीच्या जाहीर सभेला समरजीत घाटगे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घाटगे यांचा प्रवेश निश्चित होईल, अशी माहिती आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी शरद पवारांनी रणनिती आखली आहे, असे सांगितले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »