मनोज जरांगे पाटील यांची एस.आय. टी.चौकशीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
आज विधिमंडळ अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या एस.आय.टी.चौकशीचे आदेश दिले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,”प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोलले पाहिजे”. जरांगेंच्या भाषेला, विधानाला काहीतरी राजकीय वास येतोय तेव्हा मीदेखील बोललो. मुख्यमंत्री म्हणून सर्व समाजाची जबाबदारी माझ्यावर आहे. उद्या कुणावरही हल्ले होतील त्यामुळे सरकार म्हणून आम्ही पाठिशी आहोत. सगळ्यांना सोबत घेऊन राज्याला पुढे न्यायचे आहे. जी काही वस्तुस्थिती आहे ती समोर आली पाहिजे. एसआयटीच्या चौकशीतून जे सत्य आहे ते बाहेर येईल. जे खरे ते समोर आले पाहिजे. कुणावरही सूडबुद्धीने आकसाने कारवाई केली नाही आणि करणार नाही. खालच्या पातळीवर, एकेरी भाषेत कुणी बोलू लागलं तर कुणालाही पाठिशी घालू नये. विरोधकांनी यात राजकारण आणू नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.