बातमी
वय कितीही असल तर ते दिसलं नाही पाहिजे!
माणूस हा कधीच आपले वय इतरांना सांगत नसतो तो नेहमी आपले वय लपविण्यासाठी खोटं बोलत असतो.खा.प्रणिती शिंदे यांनी असच एक गमतीशीर विधान सोलापुरात केलं आहे,”वय कितीही असल तर ते दिसलं नाही पाहिजे “! .
माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खा.प्रणिती शिंदे हे उपस्थित होते याप्रसंगी बोलताना खा.प्रणिती शिंदे यांनी दिलीप मनेंच्या वयावरून बोलतांना सांगितले की माणूस शाकाहारी असला की तो जास्त तरुण दिसतो तसेच तरुणपण दिलीप मानेंच्या चेहऱ्यावर आहे असं मत त्यांनी मांडले.