बारामती येथे पुणे विभागीय नमो रोजगार मेळावा आयोजित केला होता यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम बारामती येथे होणार असल्यामुळे खा.शरद पवार यांनी त्यांना जेवणासाठी आमंत्रण दिले होते परंतु त्या आमंत्रणला शिंदे आणि फडणवीस यांनी पत्राद्वारे नकार दिला आहे.
काय लिहिले पत्रात ?
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एक पत्रही शरद पवारांना लिहंलं असून त्यांचे आभारही मानले आहेत.एकनाथ शिंदे यांनी पत्रात लिहिलं आहे..की, आपले २८ फेब्रुवारी २०२४ रोजीचे पत्र मिळाले. आपण आपल्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी निमंत्रित केल्याबद्दल मी आपला आभारी आहे. परंतु पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी आपल्याकडे इच्छा असुनही यावेळी येऊ शकणार नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.तरी भविष्यात नक्कीच आपल्याकडे भोजनाचा योग येईल असे मला वाटते. पुन्हा एकदा निमंत्रणाबद्दल धन्यवाद !! तर व्यस्त कार्यक्रमांमुळे आपण या जेवणासाठी हजर राहू शकणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी नम्रपणे सांगितलं आहे. आपले पत्र मिळाले. भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे