शेतीविषयक
मार्चच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस! पंजाबराव डक यांचा अंदाज
येणाऱ्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज परभणी येथील हवामान तज्ञ पंजाब डक यांनी दिला आहे.यावर्षीचा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी गहू,हरभरा,मका,दादर याची लागवड केली आहे.१,२,३,४,५ मार्चच्या दरम्यान अवकाळी पाऊस कोसळणार आहे तरी शेतकऱ्यांनी आपली पिके काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असे आव्हान हवामान तज्ञ पंजाब डक यांनी केले आहे.
कोण आहेत पंजाब डक ?
पंजाब डक हे मूळचे गुगळी धामणगाव ता.सेलू जि.परभणी येथील रहिवासी असून ते सध्या जिल्हा परिषद परभणी येथे अंशकालीन शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
१ मार्चच्या पहिले सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीतील सर्व रब्बी हंगामातील कामे करून घ्यावेत
पंजाबराव डक हवामान तज्ञ