मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात जोरदार धक्काबुक्की
राज्याचे मंत्री दादा भुसे आणि कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबी मध्ये जोरदार धक्काबुक्की झाल्याचे माहिती समोर येत आहे.मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार भरत गोगावले यांच्या समक्ष धक्काबुक्की झाल्याचे समजते.ज्या पद्धतीचा वाद या एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये झाल्याचं समोर आलेलं आहे, यावरुन राजकीय वर्तुळात पक्षांतर्गत कलहाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.आमदारांमध्ये अशा पद्धतीची धक्काबुक्की होणं आणि तेही एकाच पक्षातल्या आमदारांमध्ये होणं, हे खरंतर महायुची सरकारमधली अशी एक पहिलीच आणि एक मोठी घटना आहे. या घटनेच्या अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं, तर मागच्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीनं वेगवेगळे वाद, या सर्व आमदारांमध्ये होताना पाहायला मिळत आहेत, त्यावरुन पक्षांतर्गत कलह तर नाही ना, असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे