क्राईम
आसाराम बापूला कोर्टाचा दणका! शिक्षा स्थगिती याचिका फेटाळली
बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला शुक्रवारी 1 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. आरोग्याच्या कारणास्तव बलात्कार प्रकरणातील शिक्षेला स्थगिती देण्याच्या आसाराम बापूच्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण सविस्तर वाचा
ऑगस्ट 2013 मध्ये, जोधपूरजवळील मनाई गावात आसारामच्या आश्रमात राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीने 15 ऑगस्टच्या रात्री आसारामवर जोधपूरमधील त्याच्या मनाई आश्रमात तिला दुष्ट आत्म्यांपासून मुक्त करण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला.