बातमी

एकत्र जीव देणार होतो, माझी हिंमत झाली नाही, तिने उडी घेतली; प्रियकराचा जबाब, चॅट हिस्ट्रीमुळे कोल्हापुरातील 23 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचं गूढ उकलल

साडेपाच वर्षांपासून ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते. तरन्नुमच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवल्यामुळे ते अस्वस्थ होते. त्यामुळे त्या दोघांनी एकत्र आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता, तिने दरीत उडी मारली, पण ऐन वेळी त्याचे धाडस झाले नाही, असा दावा तरुणाने केल्याचं पोलिसांनी सांगितलंएका कड्यावरुन सुमारे १००० फूट खोल दरीत ढकलून २३ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनीची हत्या केल्याच्या संशयावरुन तिच्या २५ वर्षीय प्रियकराला अटक करण्यात आली आहे. श्रीपाद वडार असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नायकवाडी धबधब्याजवळील कड्याच्या खाली तरुणीचं शव सापडलं होतं.शनिवारी आरोपी श्रीपाद वडार यानेच पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली की, “इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी तरन्नुम नाईक ही गरगोटी येथे आपल्या आजीसोबत राहत होती. ती एका कड्यावरुन दरीत पडली आहे.” त्यानंतर पोलिसांना या मृत्यूची माहिती मिळाली. पोलिसांनी एका पथकाला त्या दुर्गम ठिकाणी पाठवले आणि तिचा मृतदेह बाहेर काढलासाडेपाच वर्षांपासून रिलेशनशीप, एकत्र जीव देण्याचा प्लॅन
“आरोपी श्रीपादने आम्हाला सांगितले की ते साडेपाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि तरन्नुमच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवल्यामुळे ते अस्वस्थ होते. त्याच्या म्हणण्यानुसार, त्या दोघांनी एकत्र आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. तिने दरीत उडी मारली, पण ऐन वेळी त्याचे धाडस झाले नाही, असा दावा त्याने केला” असे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी सांगितले.निर्जन भागात दोघं गेले
नायकवाडी धबधबा गरगोटीपासून सुमारे ५० किमी अंतरावर, घनदाट जंगलाच्या भागात आहे. पावसाळ्यानंतर धबधबा कोरडा पडला होता आणि शुक्रवारी जेव्हा ते दोघं तिथे पोहोचले, तेव्हा त्या परिसरात कोणीही पर्यटक नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »