
भाजपाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार स्मिता उदय वाघ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.परंतु भाजपाने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना दिले आहे तिकीट नाकारण्याच्या नाराजीतून उन्मेष पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला त्यांची सोबत पारोळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण पवार यांनी सुद्धा प्रवेश केला आहे.हा एक मोठा धक्का भाजपला बसला असून या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून करण पवार यांना उमेदवारी दिली आहे. एकतर्फी वाटणारी निवडणूक करण पवार यांच्या उमेदवारी मुळे रंगतदार होणार आहे या मतदारसंघात भाजपला धक्का सुद्धा बसू शकतो अशी चर्चा आहे त्यामुळे येथील उमेदवार बदलले जाणार अशी जोरदार चर्चा आहे.