खांदेशबातमीराजकारण

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग! नरहरी झिरवाळ यांच्या जागी खानदेशातील अनिल पाटलांना संधी मिळणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर खानदेशातील अमळनेरचे माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रिपदाबाबतही राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. त्यामुळे झिरवाळ यांच्या जागी अनिल पाटील यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, २ नोव्हेंबर रोजी अनिल पाटील यांना मुंबईतून तातडीने बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू असून, त्यानंतर पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक होणार असल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमुळे अनिल पाटील यांच्या राजकीय पुनरागमनाच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

निल पाटील यांनी काय सांगितले?

मुंबईला रवाना होण्यापूर्वी अनिल पाटील यांनी मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत कोणतेही ठोस विधान केलेले नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेण्यासाठी आपण मुंबईला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यायची, हा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेत असतात, असेही त्यांनी सांगितले. 

खानदेशाला पुन्हा मंत्रिपद मिळणार?

अनिल पाटील यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळाल्यास खानदेशाच्या राजकारणात त्याचे महत्त्वपूर्ण पडसाद उमटू शकतात. विशेषतः जळगाव जिल्ह्याच्या राजकीय दृष्टीने ही घडामोड महत्त्वाची ठरू शकते.

मात्र, नरहरी झिरवाळ यांना मंत्रिमंडळातून वगळले जाणार किंवा त्यांच्या जागी अनिल पाटील यांची नियुक्ती होणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या या चर्चांना राजकीय तर्कवितर्क म्हणूनच पाहणे योग्य ठरेल.

आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो आणि खानदेशातील अनिल पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळते का, याकडे संपूर्ण खानदेशाचे लक्ष लागले आहे.

खानदेशातील अनिल पाटलांची मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री होणार का? की नरहरी झिरवाळ यांचे मंत्रिपद कायम राहणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »