रावेर लोकसभा मतदारसंघात हायहोल्टेज फाईट!
जळगाव आणि आताच्या रावेर मतदारसंघातून लेवा पाटीदार समाजाचा एकमेव प्रतिनिधी देशातील संसदेत निवडून जातो. या निवडणुकीनंतरही हा इतिहास कायम राहणार की वेगळाच कौल येणार हे पाहण्यासाठी लोकसभा २०२४ ची निवडणूक जवळ आली आहे. यासाठी यामतदारसंघातून लेवा समाजाच्या खासदार रक्षा खडसे आणि डॉ. केतकी पाटील,रवींद्र प्रल्हाद पाटील,मंत्री गिरीश महाजन त्यांच्या पत्नी साधना महाजन या तुल्यबळ उमेदवारांत लढत होइल. त्यामुळे ही लढत राज्यभरात “हाय होल्टेज’ ठरणार आहे.
मतदारसंघात भाजप व शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुती आणि कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस,शिवसेना उद्धव ठाकरे महविकास आघाडीचे उमेदवार जाहीर करण्यास प्रतीक्षा आहे. भाजपतर्फे खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही, याची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू आहे की मंत्री गिरीश महाजन यांना किंवा त्यांच्या पत्नी साधना महाजन उमेदवारी दिली जाते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे . राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस महाविकास आघाडीतत तर उमेदवारीसाठी कोणी इच्छुक दिसत नाही आहेत. महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र प्रल्हाद पाटील हे ही इच्छुक आहेत त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यास एकतर्फी वाटत असलेली ही निवडणूक लेवा पाटील मतदार आणि मराठा मतदार या पातळीवर दोन तुल्यबळ उमेदवारांची लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
विद्यमान खासदारांचा दांडगा जनसंपर्क
महायुतीच्या रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांची तीसरी टर्म आहे. कोथळीच्या सरपंच, जिल्हा परिषद सदस्य ते थेट खासदारकीच्या कामाचाही अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. या शिवाय खासदार म्हणून त्यांनी दिल्लीतील संसदेत आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. उत्कृष्ट संसद सदस्यांतही त्यांची गणना झाली. या शिवाय मतदारसंघात संपर्क ठेवण्याचे कामही त्यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे त्यांच्या मतदारसंघातील संपर्काबाबत कौतुक केले आहे. या शिवाय थेट वाड्या वस्त्यांपर्यंत भेट देवून त्या ठिकाणी वीज पोहोचविण्यासाठी प्रयत्न त्यांनी केले, ही त्यांची जमेची बाजू आहेच.
डॉ. केतकी पाटील उच्चशिक्षित राजकारणी
गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केलेल्या डॉ. केतकी पाटील ह्या उच्चशिक्षित राजकारणी आहेत. त्यांचे गोदावरी मेडिकल कॉलेज असून शिवाय त्याच कॉलेजच्या माध्यमातून ते या परिसरात रुग्णांना सेवा देत आहेत. ही त्यांच्या सामाजिक कार्याची जमेची बाजू आहे. शिवाय जातीय समीकरणाच्या गणितातही लेवा पाटीदार समाजाची विरोधी उमेदवाराच्या तोडीची मते ते घेऊ शकतात. त्यामुळे या मतदार संघातील लढत ही तुल्यबळ ठरण्याचे चित्र दिसत आहे. शेवटी युद्ध आणि निवडणुकीत निकाल लागेपर्यंत कोणीही काहीच सांगू शकत नाही, हेच सत्य आहे.
मंत्री गिरीश महाजन उघडणार मर्जीतले पत्ते !
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून राज्यातील मंत्र्यांना उमेदवारी दिली जाईल व त्यात रावेर लोकसभा मतदार संघातून गिरिश महाजन यांना तिकिट मिळेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. परंतु, रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपची मजबूत स्थिती पाहता महाजन यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची गरज नसल्याची स्थिती आहे.”
महाविकास आघाडीची भिस्त रवींद्र भैय्यांवर!
रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची पाहिजे तशी ताकद नाही.या मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे फारसे कोणी उच्छुक दिसत नाही सगळी भिस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र प्रल्हाद पाटील यांच्यावर आहे