क्राईम
गुजरातमध्ये सापडला ३३०० किलो हजारो कोटींचा ड्रग्सचा साठा
गुजरातचा समुद्र किनारा हा ड्रग्जचं आगार झाल्याची परिस्थिती आहे. कारण इथं पुन्हा एकदा मोठा ड्रग्जचा साठा नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं पकडला आहे.मोदींच्या गुजरात राज्यात ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाली आहे.३,३०० किलो वजनाचं हजारो कोटींचं हे ड्रग्ज आहे. गुजरात एटीएस, एनसीबी आणि तटरक्षक दलानं ही संयुक्त कारवाई केली आहे.