राजकारण
अजित पवारांनी सांगितलं भाजपसोबत जाण्याचे कारण…
मला राजकारणात कुणी आणलं कुणी मंत्री पद दिलं याबाबत अनेकदा चर्चा झाल्या आहेत मला राजकारणात अपघाताने संधी मिळाली आहे युवकांची राजकारणात गरज होती. कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली कुणाच्याही भावना दुखावणे, पाठीत खंजीर खूपसणे, दगा देणे, गद्दारी करणे असा उद्देश नव्हता.या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली होत असलेला विकास मला महत्त्वाचा वाटला कणखर नेतृत्व आणि योग्य निर्णय ही त्यांची कार्यप्रणाली माझ्याशी मिळती जुळती आहे सत्ता असेल तर राज्याचा मतदारसंघाचा विकास करता येतो हे जाणून मी होतो म्हणून मी भाजपा सोबत जाण्याचा निर्णय घेतला.