राजकारण
निलेश लंके शरद पवारांकडे परतणार
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित केली होती त्यात पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी दांडी मारल्याची चर्चा आहे.नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य सौ राणी लंके किंवा स्वतः आमदार लंके हे उमेदवारी करणार असल्याची चर्चा आहे.नुकतेच आ.लंके यांनी खा.अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य अहमदनगर शहरात आयोजित केले होते त्याला उदंड असा प्रतिसाद लाभला होता.