
राज्यातील महायुतीच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याच्या निमित्ताने देण्यात आले.त्यात शिंदे सेनेच्याही मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास मर्जीतले लाडके आमदार संतोष बांगर यांनी मला आरोग्यमंत्री करा अशी मागणी केली आहे.आमदार बांगर यांच्या मागणीला उपमुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल.