
उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. अजित पवार स्पष्टवक्ते आहेत. ते शिस्तप्रियदेखील आहेत. त्यांना शिस्त आवडते. त्यामुळे ते शिस्तीच्या बाबतीत अधिकाऱ्यांनादेखील सोडत नाहीत. अजित पवार यांनी नुकतंच बारामतीकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बेशिस्त वागणाऱ्या तसेच नियम न पाळणाऱ्या बारामतीकरांना चांगलाच दम दिला
“आईसारखं कुणी नसतं. मी पण ज्यावेळेस बारामतीत येतो त्यावेळेस आईला भेटतो. आज मला भरपूर कामे आहेत. मात्र रात्रीच मी आईला भेटलो. दर्शन घेतलं. तिच्याशी गप्पा मारल्या, आईशी अतिशय आपलेपणाने वागा. कारण आपण समाजात जन्म घेतलाय तो आपल्या आई-बापामुळे. त्यामुळे शेवटपर्यंत जीवात जीव असेपर्यंत त्यांना विसरू नका”, असं आवाहन करत अलीकडची नवी पिढी आई-बापाकडे नीट बघत नाही. हे वागणं बरं नव्हं, असा टोला देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. बारामतीत सावित्री हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.