
राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांमागे बदनामीचा नाहक ससेमिरा लागू झाला आहे.यात आता परभणीच्या पालकमंत्री आणि राज्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भर पडली आहे.
हडपसर येथून नागपुरकडे जाणाऱ्या दारु विक्री करणाऱ्या एका अवैध ट्रकवर राज्यमंत्री मेघनादिदी साकोरे-बोर्डिकर असं नाव लिहिण्यात आले आहे यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे.